श्रीराम फायनान्स च्या बेकायदेशीर वसुली कार्यवाही विरोधात धरणे आंदोलन
आज सावंतवाडी येथे महाराष्ट्र लोकाधिकार समितीतर्फे श्रीराम फायनान्स च्या बेकायदेशीर वसुली कार्यवाही विरोधात धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले. व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या धरणे आंदोलनात महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
या आंदोलनात श्रीराम फायनान्स तर्फे चर्चेसाठी आलेल्या शाखा व्यवस्थापकावर मालवणकर यांचे 2015 मधील11 लाख लोनचा 69 लाख लोन कसे झाले तसेच अन्य अन्याय ग्रस्त लोकांकडून प्रश्नांचा पाढाच वाचण्यात आला आला. महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ऍड प्रसाद करंदीकर यांनी शाखा व्यवस्थापकास धारेवर धरले. शेवटी श्रीराम फायनान्स शाखा व्यवस्थापक यांनी एप्रिल एंडिंग पर्यंत सर्व प्रकरणी योग्य ते कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात ऍड प्रसाद करंदीकर अध्यक्ष लोकाधिकार समिती. दीपक कुडाळकर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष. योगेश वाघमारे. मंगेश शिंदे. नंदकुमार लोकरे. राजेश माने. संजय पवार. योगिता राणे. समीर आचरेकर.कमलेश चव्हाण. विवेक नाईक कोमल केरकर. वैष्णवी गोवेकर. पूजा आचरेकर. रश्मी दाभोलकर व अन्य 100 ते 120 कार्यकर्ते उपस्थित होते.
सरते शेवटी दीपक कुडाळकर यांनी या पुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही जर कोणावर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे तक्रार आल्यास योग्य तो न्याय दिला जाईल असा इशारा देण्यात आला
Post a Comment
0 Comments