वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृति काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
नगर वाचनालय, वेंगुर्ले या संस्थेतर्फे जिल्हास्तरीय सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृति काव्यवाचन स्पर्धा रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजता श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
संस्थेने स्थानिक वृत्तपत्रामधून सदर काव्य वाचन स्पर्धेसाठी जिल्हयातील कवींना स्वरचित कविता पाठविण्याचे आवाहन केले होते. संस्थेने आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धेसाठी जिल्हयातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यातील निवडक कवींना रविवार दिनांक १६/०२/२०२५ रोजी कविता सादर करण्यासाठी नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेतर्फे निमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रित करण्यात आलेल्या वेंगुर्ले शहराच्या बाहेरुन येणाऱ्या कवींना प्रत्येकी रुपये २००/- एवढा प्रवास खर्च देण्यात येणार आहे. निमंत्रित कवींच्या सादरीकरणामधून तीन क्रमांक निवडण्यात येतील. सदर पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे रु.३००१/-, रु.२००१/- व रु.१००१/- पारितोषिक देण्यात येणार आहे. सादरीकरणाला गुण असल्याने प्रभावी सादरीकरणातून प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. तरी संस्थेने निमंत्रित केलेल्या कवींनी आपली कविता सादर करण्यासाठी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे. असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिल श्रीकृष्ण सौदागर व कार्यवाह श्री. कैवल्य पवार यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments