Type Here to Get Search Results !

बदनामी केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बदनामी केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

बदनामी केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
फिर्यादी भाग्यवंत यशवंत वाडीकर यांची बदनामी केल्याप्रकरणी आरोपी तानाजी भाऊ सावंत (५६ कणकवली) विरुद्ध वेंगुर्ला न्यायालयात गुन्हा दाखल

 वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीशसाहेब डी.वाय. रायरीकर यानी दि. २०/०१/२०२५ रोजी आदेशीका काढुन
गुन्हा दाखल केलेला आहे. फिर्यादीच्या वतीने ॲड. मनीष सातार्डेकर व ॲड. अक्षदा राऊळ
यांनी काम पाहीले.
फिर्यादी हे सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत सिंधुदुर्गनगरी ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग या नोंदणीकृत सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते व त्यांनी मागील तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी अध्यक्ष म्हणुन काम पाहिलेले आहे व सुमारे आठ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत ते पतसंस्थेवर संचालक या पदावर कार्यरत होते. सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी, महसुल कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी व इतर राज्य सरकारी कर्मचारी हे सदर संस्थेचे सदस्य असुन संस्थेचे संपुर्ण जिल्ह्यात २४५८ सदस्य आहेत. आरोपी हा देखील वरील संस्थेचा सभासद आहे. फिर्यादी हे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क चे पाच वर्ष अध्यक्ष होते तसेच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या कार्यकारणीवर सुमारे पंचवीस वर्षांहुन अधिक काळ कार्यरत आहेत. तसेच न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. तसेच अखिल भारतीय न्यायालयीन कर्मचारी फेडरेशनमध्ये कार्यकारी संचालक म्हणुन कार्यरत होते. असे असता सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत सिंधुदुर्गनगरी ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांनी घेतलेल्या निवडणुकीमध्ये दिनांक १६/१०/२०२२ रोजी पंधरा पैकी तेरा संचालक हे फिर्यादी यांच्या पॅनलचे निवडुन आले व याचा राग मनात ठेवुन आरोपी याने
कोणताही सबळ पुरावा नसताना आरोपी याने व्देषबुद्धीने फिर्यादी तसेच इतर संचालक यांनी
निवडणुकीत सभासदाना आमिष दाखवण्याच्या हेतुने बेकायदेशीररित्या अग्रीम लाभांश वाटप करुन आर्थिक नुकसान केले अशी खोटी तक्रार फिर्यादी तसेच इतर संचालक यांची नावे नमुद करुन आरोपी याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. २३/०२/२०२३ रोजी खोटी लेखी तक्रार करुन फिर्यादी व इतर संचालक यांनी
बदनामी केली तसेच आरोपी याने मा. विभागीय सहनिबंधक सरकारी संस्था कोकणभवन नवी मुंबई यांच्या कार्यालयात तसेच सचिव सहकार मंत्रालय मुंबई यांच्याकडे देखील खोटी लेखी तक्रार केली व फिर्यादी तसेच इतर संचालक यांची बदनामी केली.सबब फिर्यादी यांची नाहक बदनामी फिर्यादी यांनी त्याबाबत व्यथीत होऊन ॲड. मनीष सातार्डेकर यांच्यामार्फत सदर गुन्हयाची फिर्याद दि.०२/०२/२०२४ रोजी वेंगुर्ला न्यायालयात दाखल केली होती. फिर्यादी यानी दाखल केलेली फिर्याद त्यामधील जाबजबाब व पुरावा पाहता
तसेच फिर्यादीच्या वतीने ॲड. मनीष सातार्डेकर यांनी फिर्यादीची मांडलेली बाजु ग्राह्य मानुन वेंगुर्ला न्यायालयाचे मा. न्यायाधीश डी.वाय. रायरीकर यांनी आरोपी विरुद्ध आदेशीका काढुन आरोपी विरुद्ध वेंगुर्ला न्यायालयात फिर्यादी यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.

Post a Comment

0 Comments