Type Here to Get Search Results !

श्री चिंतामणी संगीत विद्यालय वेंगुर्ले या विद्यालयाचा विद्यार्थी कु. वेदांग महेश बोवलेकर याचे संगीत तबला विशारद परीक्षेत उज्वल यश.


श्री चिंतामणी संगीत विद्यालय वेंगुर्ले या विद्यालयाचा विद्यार्थी कु. वेदांग महेश बोवलेकर याचे संगीत तबला विशारद परीक्षेत उज्वल यश.

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया मार्फत डिसेंबर 2024 या सत्रात घेण्यात आलेल्या तबला
 विशारद च्या परीक्षेत तो बसला होता.
सात वर्षाच्या या अभ्यासक्रमात त्याने अथक मेहनतीच्या जोरावर उज्वल यश संपादन केले.  
सद्या तो कुडाळ येथील एस् .आर .एम.काँलेज मध्ये बी.एस्.सी काॅम्प्युटर सायन्स हा विषय घेऊन आपले महाविद्यालयीन पूर्ण करीत आहे. 

        पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे ज्युनिअर काँलेज वेंगुर्ला चे प्राध्यापक श्री.महेश बोवलेकर यांचा तो मुलगा असून आई वडिलांच्या उत्तम संस्कारातून घडलेला तो गुणी वादक आहे.

         शिवाय तबला सोलो,भक्तीगीत.नाट्यसंगीत, भजन या सर्व संगीत प्रकारात उत्तम साथ संगत करीत त्याने उत्कृष्ट तबला वादनाची बक्षिसे ही मिळविली आहेत.
या यशात त्याला
चिंतामणी संगीत विद्यालयाचे संचालक श्री.निलेश पेडणेकर सर आणि मनिष तांबोस्कर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल त्याचे श्री चिंतामणी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.प्रविण कांदळकर,उपाध्यक्ष महेश मुणनकर सचिव श्री.तेजस मेस्त्री आणि सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments