Type Here to Get Search Results !

हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी आयोजित रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद


हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी आयोजित रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

नवप्रभात NEWS 

२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी उद्घाटन प्रसंगी मच्छीमार नेते भाई मालवणकर, डॉ. सुनील साळगावकर, अक्षता नाईक, मुख्याध्यापीका शामल मांजरेकर, वेतोरे पोलीस पाटील सुशांत नाईक, शामसुंदर मुणंनकर, तं.मु. अध्यक्ष संतोष साळगावकर, शा.व्य.स. अध्यक्ष अमित कोरगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते. एस एस पी एम हॉस्पिटल पडवे आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी या ब्लड बँक उपस्थित होत्या यावेळी ग्रामीण भागात अशा मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहून शहरातही असा प्रतिसाद मिळत नसल्याचे भाई मालवणकर यांनी सांगितले. तर डॉ. साळगावकर यांनी आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाहीत. अशा मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून हेल्प रूप फाउंडेशनचे कौतुक केले. सुशांत नाईक यांनी रक्तदात्यांचे केले जाणारे स्वागत त्यांना दिला जाणारा आदरपूर्वक सन्मान हे स्मरणीय आहे या शिबिरात मला सुद्धा कणभर का होईना सहभागी होता आल्याने समाधान मिळाल्याचे म्हणाले. अक्षता नाईक यांनी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी झटत राहा आपणही आपल्याबरोबर सदैव आहोत असे म्हणाल्या. मुख्याध्यापक मांजरेकर यांनी हेल्प ग्रुप फाउंडेशन बद्दल गौरवोद्गार काढतानाच शुभेच्छा दिल्या. २४ वर्ष सेवा बजावणारे पोलीस पाटील धोंडू खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हेल्प ग्रुप फाउंडेशन चे सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी केले. हेल्प ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुमन कामत यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सूत्रसंचालन सुनील नाईक यांनी केले.

Post a Comment

0 Comments