पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सावंतवाडी येथील दीप रेसिडेन्सीच्या फ्लॅटधारकांनी उपोषण घेतले मागे
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
सावंतवाडी येथील दीप रेसिडेन्सीचे विकासक पाराळे यांच्याशी पालक मंत्री नितेश राणे यांनी स्वतः बोलून कामांची पूर्तता करून घेईन असे आश्वासन दिल्याने दिप रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपोषण मागे घेण्यात आले.
सावंतवाडी सालईवाडा येथील दीप रेसिडेन्सी गृहनिर्माणमधील स्लॅब लिकेज व इतर प्रलंबित कामाबाबत दीप रेसिडेन्सी मधील सर्व फ्लॅट धारकांनी 26 जानेवारीी रोजी उपोषण छेडून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा इशारा दिला होता .
मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये आपण स्वतः हा बिल्डिंगचा विषय हाताळून पाराळे यांच्याशी बोलून कामांची पूर्तता करुन देईन असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे फ्लॅट धारकांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.
Post a Comment
0 Comments