माणगाव येथील कृष्णा आडेलकर यांचा प्रामाणिकपणा
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
बुधवार १५ जानेवारी रोजी माणगाव येथील रहिवासी कृष्णा प्रकाश आडेलकर यांना सावंतवाडी ते वेंगुर्ले अशा प्रवासादरम्यान मळगाव येथे सकाळी रियल मी कंपनीचा सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल आढळून आला होता.त्यांनी तो मोबाईल वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे जमा केला होता.
सदर मोबाईलबाबत वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सायबर शाखा येथील प्रथमेश गावडे यांच्या सहकार्याने वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस दिपा मठकर यांनी शोध घेऊन त्या मोबाईलचे मालक रामकृष्ण मोहन धुरी , शेर्ले, ता. सावंतवाडी यांची माहिती व ओळख निष्पन्न करून त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत कृष्णा आडेलकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments