उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे वैद्यकीय व दंत शिबीराचे आयोजन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
जिल्हा शल्यचिकीत्सक, सिंधुदुर्ग डॉ. श्रीपाद पाटील यांच्या सूचनेनुसार व मा. निवासी वैद्यकीय अधिकारी, सिंधुदुर्ग डॉ. सुबोध इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २८,२९,३० जानेवारी २०२५ यादिवशी उपजिल्हा रुग्णालय, वेगुर्ला येथे वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असुन या शिबिरामध्ये भिषक शल्यचिकीत्सक बालरोगतज्ञ, प्रमुती व स्त्रीरोगतज्ञ, नाक, कान व घसा तज्ज्ञ व दंत चिकीत्सक यांचेमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच दिनांक २८/०१/२०२५ रोजी रुम्णांची तपासणी व रोगनिदान करण्यात येणार असून दिनांक २९/०१/२०२५ रोजी तपासणीअंती विवडलेल्या शर्वकापात्र रुग्णांना शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तसेच वैद्यकीय चाचण्या व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे.
आरोग्य प्रदर्शनाव्दारे सकस आहार, असंसर्गजन्य आजार, माता व बालसंगोपन, जलजन्य व किटकजन्य आजार याची माहिती देण्यात येणार आहे. आभाकार्ड, अवयवदान जनजागृती व आयुष्यमान कार्ड काहण्यात येणार आहे.
तरी गरजु रुग्णानी सदर शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी, वेंगुर्ला डॉ. लिलाधर लिलाके व वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला डॉ संदिप सावंत यांनी केलेले आहे.
Post a Comment
0 Comments