मठ येथे स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील मठ शिवाजी चौक येथे स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मठ माजी उपसरपंच निलेश नाईक यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयीमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईक , वेंगुर्ले ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख उमेश नाईक ,महेश सावंत , महेश धुरी , सुनील बोवलेकर , अरविंद बागाययतकर , सुहास तेंडोलकर , ज्येष्ठ शिवसैनिक बाबल गावडे , वासुदेव गावडे , खानोलकर , गावडे , मठकर आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.यावेळी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
Post a Comment
0 Comments