Type Here to Get Search Results !

वेंगुर्लेत २६ रोजी जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगायन स्पर्धा


वेंगुर्लेत २६ रोजी जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगायन स्पर्धा

   योगेश तांडेल 
नवप्रभात  NEWS 

    समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने जिल्हास्तरीय 'वंदे मातरम्' देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ले कॅम्प येथील वेंगुर्ला हायस्कूलमध्ये २६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
   हि स्पर्धा एकाच गटात होणार असून प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ५००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ३००० रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी २००० रुपये व चषक व दोन उत्तेजनार्थ क्रमांकासाठी प्रत्येकी रोख १००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी सर्वच स्पर्धकांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात येईल. स्पर्धेसाठी देशभक्तीपर गीत सादर करणे अनिवार्य आहे. गीत सादर करण्यासाठी एकूण १० मिनिटे वेळ देण्यात येणार आहे. एका संघात कमीत कमी सहा सदस्य असावेत. संगीतसाथ स्ततःच आणावयाची आहे. ट्रॅकचा बापर करण्यास मुभा आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी समर्पणचे सचिव महेंद्र मातोंडकर ९१५८८८१६१८ यांच्याशी संपर्क साधावा. सहभाग घ्यावा, असे आवाहन समर्पपणचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments