'मराठी भाषा : रोजगाराच्या संधी' यावर उद्या वेंगुर्ले येथे उद्बोधन वर्ग
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत भाषा संचालनालय आणि बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले येथे 'मराठी भाषा : रोजगाराच्या संधी' या विशेष कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे करण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या रोजगाराच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, मराठी भाषेचे संवर्धन व प्रचार-प्रसार करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या उद्बोधन वर्गात भाषा सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य चे सदस्य चे मा. डॉ. प्रकाश परब विशेष मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मारुती भिवा चौगले असून यावेळी मान्यवर म्हणून श्रीमती मनीषा पाटणकर - म्हैसकर सहसंचालक, मराठी भाषा विभाग आणि श्रीमती विजया डोनीकर - भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, प्रा.डॉ. पांडुरंग गावडे - मराठी विभाग प्रमुख खर्डेकर महाविद्यालय, अभयराजे कुलकर्णी,पर्यवेक्षक -भाषा संचालनालय आणि दशरथ नाईक अधिक्षक- भाषा संचालनालय हे उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम ३६ जिल्ह्यांमधील ३६ मार्गदर्शन सत्रांपैकी एक असून, मराठी भाषेचे व्यावसायिक महत्त्व, करिअरच्या नवीन वाटा, तसेच मराठी भाषेतील रोजगाराची शक्यता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उद्बोधन वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.
Post a Comment
0 Comments