शामसुंदर राय हे किती पक्षांमध्ये एकनिष्ठ राहिले..संदीप पेडणेकर
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
शामसुंदर राय यांची तालुका कृषी सेल अध्यक्ष निवड झाल्यापासून त्यांनी पक्षासाठी व पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी कोणताही सहभाग घेतलेला नाही. त्याचप्रमाणे पक्षासाठी कोणतेही काम केलेले नाही तसेच पक्षाच्या विरोधात राहून महा विकास आघाडीचे उबाठा पक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याबरोबर राहून त्यांचे काम केलेले आहे .त्यामुळे शामसुंदर राय हे किती पक्षांमध्ये एकनिष्ठ आहेत ते त्यांनी सांगावे. जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादां यांच्या पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिले असते तर आज त्यांचे अनेक विषय मार्गी लागले असते.
महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना व प्रकल्प राबवले आहेत तसेच पुढील काही वर्षात शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना हे सरकार राबवणार आहे. असेही वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी म्हटले आहे
Post a Comment
0 Comments