शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त १७ फेब्रुवारी २०२५ तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धेचे आयोजन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली टांक येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता टांक येथील मारुती मंदिरामध्ये होणाऱ्या या तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या (मराठी) लहान गट – १ ली ते ४ थी श्री गणपती स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र पठण करावयाचे आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम-रु ७५१/द्वितीय-रु ५५१/ तृतीया-रु ३५१/ चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांनी आपली नाव नोंदणी अंतिम तारीख १० फेब्रुवारी पर्यत 7588958080 या क्रमांकावर करायची आहे असे आवाहन शिवप्रेमी मित्र मंडळ कडून करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments