Type Here to Get Search Results !

साहित्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


साहित्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
                       
   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

सिधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांच्या लेखणीला प्रोत्साहन मिळण्यासाठी, त्यांच्या साहित्याचा गौरव होण्यासाठी टांककर-शेटये ट्रस्ट पुणे यांच्यावतीने देण्यात येणा-या ‘स्व.रमाकांत गुरूनाथ शेटये स्मृती साहित्य पुरस्कारासाठी लेखकांनी आपला प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे.

      वेंगुर्ला नगर वाचनालय सन २०१८ पासून हा पुरस्कार वितरण करीत आहे. यासाठी टांककर-शेटये ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन शेटये यांनी संस्थेकडे १ लाखांचा कायम निधी ठेवला आहे. रोख पाच हजार, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०२४च्या पुरस्कारासाठी सिधुदुर्गातील साहित्यिकांनी आपले नाव, प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची नावे, मिळालेले पुरस्कार व इतर माहितीसह प्रस्ताव नगर वचनालय, वेंगुर्ला संस्थेकडे कार्यालयीन वेळेत २४ डिसेंबरपर्यंत पाठवावा, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments