Type Here to Get Search Results !

तुळस येथे ०५ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय 'शांती आणि सहकार्यासाठी' दौड स्पर्धा......वेताळ प्रतिष्ठान तर्फे 'अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत' स्पर्धेचे सलग ११व्या वर्षी आयोजन



तुळस येथे ०५ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय 'शांती आणि सहकार्यासाठी' दौड स्पर्धा
वेताळ प्रतिष्ठान तर्फे 'अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत' स्पर्धेचे सलग ११व्या वर्षी आयोजन

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

    वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत श्री वेताळ मंदिर तुळस, खरीवाडा येथे रविवार दि. ०५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठिक ६.३० वा. जिल्हास्तरीय 'शांती आणि सहकार्यासाठी' दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.२०२५ मध्ये होणाऱ्या जागतिक शांती आणि सहकार्य वर्षाच्या निमित्ताने प्रचार प्रसिध्दीसाठी सदर दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. हे वर्ष संपूर्ण जगभरातील शांती,सहयोग, आणि एकतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जाईल. या दौड स्पर्धेचा उद्देश समाजातील विविध गटांना एकत्र आणून शांती, सौहार्द आणि समजूतदारपणाचा संदेश प्रसारित करणे आहे.
  १२ गटात होणार स्पर्धा होणाऱ्या या स्पर्धेत 'खुला पुरुष' व 'महिला', इ.१ली ते २री, इ.३री ते ४थी, इ.५वी ते ६वी, इ.७वी ते ८वी , इ.९वी ते १०वी प्रत्येकी मुली व मुलगे अशा  एकूण १२ गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.  स्पर्धेतील प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्याना अनुक्रमे _खुल्या पुरुष_ गटासाठी रु१५७५, १०७५,७७५ तर _खुल्या महिला_ गटासाठी अनुक्रमे रोख रु ८८८, ६६६, ४४४ तसेच उर्वरित सर्व शालेय गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र  देऊन गौरविण्यात येईल.
     शालेय गटात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ओळखपत्र किंवा शाळेचे शिफारस पत्र आणणे अनिवार्य आहे. अधिक माहिती व नाव नोंदणी साठी  महेश राऊळ (९४०५९३३९१२) व प्रदीप परुळकर (९५५२४३६४७७) संपर्क करावा. असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments