Type Here to Get Search Results !

केळुस कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात शुद्धीकरणाच्या निमित्ताने ७ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांच्या आयोजन

केळुस कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात शुद्धीकरणाच्या निमित्ताने ७ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांच्या आयोजन

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ली तालुक्यातील केळुस कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात ७ डिसेंबर रोजी शुद्धीकरणाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

🟤सकाळी ५.३०  वाजता श्रीं ची शोडोषोपचारे पुजा .
🟤 ब्राह्मणांकरवी श्रीं चरणी तुळशी पत्रं वाहून विष्णु सहस्त्रनाम जप.
 सभा मंडपातील फरशी कामाचे उद्द्घाटन 
श्री. बाबणोजी देवु केळुसकर, केळुस कालवीबंदर रा. मुंबई घाटकोपर ह्यांचे शुभ हस्ते 
 🟤 सकाळी ८.०० वाजता 
देवालयाच्या सामानासाठी साकार झालेल्या नविन इमारतीचे उद्द्घाटन कालवीबंदर चे लोकप्रिय व्यक्तीमत्व आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबुराव ताम्हणकर ह्यांचे शुभ हस्ते होणार आहे.
🟤 सकाळी ९.३० वाजता 
श्री सत्यनारायणाची महापूजा
 🟤 दुपारी १२.०० वाजता महाआरती.
🟤आरती नंतर तिर्थ प्रसाद आणि महाप्रसाद.
तरी आपण सर्व भक्तगणांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन शोभा वाढवावी.

🟤कालवी ग्रामस्थांची इच्छापूर्ती म्हणजे देवालयाचे साहित्य ठेवण्यासाठी नविन इमारतची निर्मिती आणि मंदिराच्या सभामंडपातील फरसबंदी चे काम.

🟤 श्री. शिवलकर बंधु कालवीबंदर ह्यांनी मंदिराचे सामान ठेवण्यासाठीच्या इमारतीला  विनामुल्य भुदान केले. इमारतीच्या बांधकामासाठी आर्थिक आणि श्रमिक सहकार्य  विठ्ठल भक्तांनी केले आणि मंदिर सभामंडपातील फरसबंदी साठी
  श्री. बाबणोजी देवु केळुसकर केळुस कालवीबंदर रा. मुंबई घाटकोपर ह्यांनी ग्रेनाईट फरशी दिली. तर फरशी बसवून देण्याचे काम श्रीकृष्ण पायी वारी वेंगुर्ला ह्यांचे मार्फत करण्यात आले.
 भाविकांनी या सोहळ्यात उपस्थित राहून कार्यक्रमांचा व श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments