अतिरिक्त रक्तदाब औषध न घेता कमी होऊ शकतो.. डॉ. जी.टी राणे
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
शिरोडा वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन तर्फे हाॅटेल हिलराॅक, शिरोडा येथे आयोजित केलेल्या डॉक्टरांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावरील अतिरिक्त रक्तदाब बाबतीत नवीन सुचना या बाबतीत सविस्तर विवेचन करून उपस्थित डॉक्टर वर्ग यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी डॉक्टर्स फ्रटर्नीटी क्लब सिंधुदुर्ग तर्फे आयोजित डॉक्टरांच्या क्रिडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या डॉ.सई लिंगवत, डॉ.सोनाली सावंत, डॉ. दिपाली पालयेकर, डॉ. प्रणाली सावंत, डॉ. हर्षाली गावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, सचिव डॉ. संजीव लिंगवत, सल्लागार डॉ. प्रल्हाद मणचेकर, वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लिलके, डॉ. ज्ञानेश्वर शिवचरण, डॉ . प्रसाद साळगांवकर, डॉ. किरण नाडर, डॉ. के.जी. केळकर, डॉ. अमेय प्रभु खानोलकर, डॉ. सुदिश सावंत, डॉ . वंदन वेंगुर्लेकर,डॉ. अमरेश होडावडेकर, डॉ. रायाजी सातोसकर, डॉ. डि. पि. गावडे, डॉ. गंधाली गावडे, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. सुरेखा काळे, डॉ. जाई पेडणेकर, डॉ. मेघश्याम रेडकर, डॉ. संगिता मुळे, डॉ. रिना उबाळे,डॉ. सुबोध माधव, डॉ. राखी माधव, डॉ. सई राणे, डॉ. महेंद्र सावंत, आदी डॉक्टर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद मणचेकर, स्वागत डॉ. राजेश्वर उबाळे तर आभारप्रदर्शन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
Post a Comment
0 Comments