Type Here to Get Search Results !

वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2 जानेवारी रोजी

वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2 जानेवारी रोजी 

    योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि 2 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. 
शिक्षण प्रसारक समितीच्या अध्यक्षा सौ स्मिता दामले यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी समर्थ सभागृहामध्ये होणाऱ्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, कार्यवाह प्रभाकर नाईक, सूर्याजी नाईक , सदाशिव पाटील, सौ प्राची नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

 श्री देवी सातेरी हायस्कूल व गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments