Type Here to Get Search Results !

"पाट हायस्कूलचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न"

"पाट हायस्कूलचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न"

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

ध्येय निश्चित करा .स्वतःशीच स्वतःची तुलना करा. विविध कौशल्य आत्मसात करा .तुम्हाला खूप यशस्वी आणि सुखी व्हायचे असेल तर त्यासाठी अपार कष्ट करावे लागतील. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच होते असे मनोगत एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस. एल देसाई विद्यालय तथा कै.सौ.एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कै.डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालय ,राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षा डॉ. विलासिनी पाटकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक तानाजी काळे यांनी शब्दबद्ध व संगीतबद्ध केलेल्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. तंत्रज्ञानाचा गैरवापर करू नका, त्यांचा चांगला वापर करा. योग्य मार्गदर्शनामुळेच तुम्ही यशस्वी व्हाल; असा अनमोल संदेश कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी राजन नाटेकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला. माझी खरी ओळख या प्रशालेची विद्यार्थिनी म्हणूनच राहील. आत्मविश्वास, आत्मसन्मान ,विनम्रता, इतरांचा आदर राखा ,सतत शिकत रहा ही जीवनात यशस्वी होण्यासाठीची पंचसूत्रे अमलात आणा. असा अनमोल संदेश कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी लीना सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात यावे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. समुद्र विज्ञानाचा अभ्यास करावा असे मनोगत एन. एल .ठाकूर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. आत्मनिर्भरतेची आपल्याला गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. देश घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे .शिक्षकांवर श्रद्धा ठेवा आणि पालकांनीही शिक्षकांशी संवाद वाढवला पाहिजे असे मनोगत गोडसे सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले . रामायणातील प्रसंग सांगून कोणती तत्त्वे आत्मसात करावीत. आपले ज्ञान वृद्धिंगत होईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे असा अनमोल संदेश संस्था पदाधिकारी सुधीर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात दिला. सन 2024-25 चा गुरुवर्य विद्याधर सामंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशालेचे माजी विद्यार्थी, खेळाडू, सहाय्यक शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापक राजन हंजनकर यांना शाल ,मानपत्र, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .यावेळी राजन हंजनकर यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. मी खूप भाग्यवान आहे. शिक्षणाच्या, शाळेच्या प्रवाहात मी आहे आणि राहीन. प्रेमाची व कौतुकाची थाप मिळाल्यामुळे माझे मन भरून आले आहे .असे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजन हंजनकर आपल्या मनोगतात म्हणाले. क्रीडा सेवा पुरस्कार राज्यस्तरीय कबड्डी पंच दाजी रेडकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी ,गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी ,एच. एस. सी., एस. एस. सी. परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावर भालाफेक खेळामध्ये निवड झालेल्या प्रशालेतील गुणवान खेळाडू कुमार दर्शन पडते याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या राधारंग फाउंडेशनच्या सदस्या अरुणा सामंत पुरस्कृत विशेष सन्मान पुरस्कार प्रशालेतील I.T शिक्षक योगेश कासकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रशालेतील कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या मार्गदर्शनांतर्गत कुमार ऋग्वेद कांबळी याने रेखाटलेले गणपतीचे सुंदर चित्र डॉ. विलासिनी पाटकर व कुमारी सोहनी संदीप साळसकर हिने रेखाटलेले गणपतीचे सुंदर चित्र गोडसे सर यांना भेट म्हणून देण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या बहुरंगी गुणदर्शन कार्यक्रमामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. जान्हवी पडते व सौ.सिद्धी चव्हाण यांच्या मार्गदर्शनांतर्गत प्रशालेतील सर्व शिक्षकांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली.
व्यासपीठावर डॉ. विलासिनी पाटकर ,एडव्होकेट गजानन पाटकर, सौ .अरुणा सामंत ,मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्ते तथा माजी विद्यार्थी उदय फणसेकर, कोचरा गावचे पोलीस पाटील गोसावी, गोडसे सर, एन .एल. ठाकूर, लीना सामंत ,संस्था पदाधिकारी सामंत दिगवर सुधीर ठाकूर, राजेश सामंत, बाबा तळावडेकर , दशरथ नार्वेकर, माजी कार्याध्यक्ष रेडकर गुरुजी ,दीपक पाटकर, शैलेश तेली ,वासुदेव हंजनकर, वृद्धाश्रम सेक्रेटरी म्हापणकर, प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक तुषार आंबेरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्या सौ.शुभांगी साळसकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुनाथ केरकर, संदीप साळसकर, सौ. दीपिका सामंत, शिक्षकेतर कर्मचारी विलास म्हापणकर, शिक्षक प्रतिनिधी तानाजी काळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर,पाहुण्यांचा परिचय संस्था पदाधिकारी राजेश सामंत, सूत्रसंचालन पूर्वा नाईक, यज्ञा साळगांवकर व आभार तानाजी काळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments