आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग तर्फे वेंगुर्ला तालुका स्कूल नंबर 1 ला क्रीडा साहित्य प्रधान
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने वेंगुर्ला तालुका स्कूल नंबर 1 ला आवश्यक असलेले क्रीडा साहित्य व लेझीम आधार फाउंडेशनच्या अध्यक्ष माधुरी वेंगुर्लेकर यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा आधार फाउंडेशनचे सचिव अॅड नंदन वेंगुर्लेकर खजिनदार वंदन वेंगुर्लेकर व क्रीडा शिक्षक जयराम उपस्थित होते
जि प पूर्व प्राथमिक शाळा वेंगुर्ले नंबर एक या शाळेत वेंगुर्लेकर कुटुंबीयांचे शिक्षण झालेले असून माजी विद्यार्थी या नात्याने आधार फाउंडेशन व वेंगुर्लेकर कुटुंबीय यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले क्रीडा साहित्य उपलब्ध करून देत तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तयार करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करून निधीम तालीम सुरू करणार असल्याचे नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले तसेच शाळेच्या इतर भौतिक गर पूर्ण करण्यासाठी डिसेंबर अखेर माजी विद्यार्थी व पालक यांची बैठक घेण्याचे हे आवाहन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर उपाध्यक्ष राकेश सापळे, स्नेहल बागडे, गायत्री मिशाळे, विनिता सामंत, समीर परब, शिक्षिका कुशे मॅडम पालक विद्यार्थी पालक शिक्षक संघ माता पालक संघाचे सभासद उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments