वेंगुर्ले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
52व्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा वेंगुर्ला पोलिस स्टेशनच्या हेडकाँन्टेबल श्रीम.रंजीता चोहान,अनुराधा देसाई, आणि श्री.मनोज परूळेकर यांच्या हस्ते प्रशालेच्या स्वामी समर्थ सभागृहात सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.संजय परब, श्री.के.डी .खरबडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक गटातून कु. मानसी वराडकर -वक्तृत्व स्पर्धा - प्रथम क्रमांक
कु. भावना गावडे निबंध स्पर्धा - द्वितीय क्रमांक
कु. मानसी वराडकर आणि कु. मनाली वगरे विद्यार्थी प्रतिकृती - तृतीय क्रमांक
माध्यमिक गट
कु. श्रावणी धुरी वक्तृत्व स्पर्धा - प्रथम क्रमांक
कु. जाई धुरी निबंध स्पर्धा - द्वितीय क्रमांक
कु. मयुरी गावडे आणि कु. कीर्ती कुंभार प्रश्नमंजुषा - तृतीय क्रमांक
कु. पूनम गावडे दिव्यांग - प्रथम क्रमांक
श्री चैतन्य सुकी सर -शिक्षक प्रतिकृती - प्रथम क्रमांक
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा ट्राफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. परूळेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्रीम .रंजीता चोहान यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे उत्तम मार्गदर्शन केले .प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. परब सर यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री .तानाजी चव्हाण सर ,सौ.ओवी पवार,सौ.सुजाता नाईक आणि श्री. चैतन्य सुकी सर यांचे अभिनंदन केले.
आभार श्री.पेडणेकर सर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments