वेंगुर्ला ते पावस पालखी सोहळा २० डिसेंबर पासून
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
रत्नागिरी-पावस येथील सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या १२२व्या जयंतीसाठी वेंगुर्ला ते पावस असा पालखी शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथून निघणार आहे. यंदाचे हे पालखी सोहळ्याचे ४९वे वर्ष आहे.
दि.२० रोजी सकाळी ८ वा. भटवाडी येथील दिलीप सामंत यांच्या विठ्ठल मंदिरातून या पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. रात्रौ ही पालखी दाभोसवाडा विठ्ठल मंदिरात राहणार आहे. दि.२१ रोजी दुपारी वेतोरे, रात्रौ कुडाळ, दि. २२ रोजी सकाळी हुमरमळा, दुपारी कसाल, रात्रौ कणकवली, दि.२३ रोजी सकाळी हुमरट, नांदगांव, तळेरे, दुपारी वारगांव, रात्रौ खारेपाटण, हातीवले, दि.२४ रोजी सकाळी राजापूर विठ्ठल मंदिर, ओणी, वाटूळ, दुपारी कुवे, रात्रौ लांजा, दि.२५ रोजी दुपारी कुरणे, रात्रौ पुनस, दि.२६ रोजी सकाळी सुकादेवी, दुपारी सापुचे तळे, रात्रौ पावस, दि.२७ रोजी पावस येथे जन्मसोहळा त्यानंतर दि.२८ रोजी वारकरी आपापल्या घरी पोहोचतील. ज्या भाविकांना या पालखी सोहळ्यात सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी सदानंद गिरप (७०८३८४२१९५) यांच्याशी संफ साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments