वेंगुर्ले पावर हाऊस येथे मोटर सायकलची धडक बसून झालेल्या अपघातात नारायण रामा पालेकर यांचा मृत्यू
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले शहरातील पावर हाऊस येथे रामघाट च्या दिशेने रस्त्याने चालणाऱ्या नारायण रामा पालयेकर वय 76 यांना पाठीमागुन येणाऱ्या पुंडलिक कृष्णा हळदणकर यांनी दुचाकीने ठोकर देवुन अपघात झाला.
हा अपघात बुधवारी रात्री 8-30 च्या सुमारास घडला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मोटर सायकल चालक पुंडलिक हळदणकर यांना अधिक उपचारा साठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर पादचारी नारायण पालयेकर यांना वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा बांबुळी येथे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
या अपघात प्रकरणी वेंगुर्ले वडखोल येथील उत्तम भालचंद्र पालयेकर यांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दिली असून दुचाकी चालक पुंडलिक कृष्णा हळदणकर यांचेवर बी एन एस 106(1),125(अ),125(ब),281 व मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानुसार वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस श्री. राठोड अधिक तपास करत आहेत.
Post a Comment
0 Comments