Type Here to Get Search Results !

कलिंगड लागवडीसाठी यंदा पोषक वातावरण.

 
कलिंगड लागवडीसाठी यंदा पोषक वातावरण.

🍉 कलिंगड लागवडीतून जिल्ह्यात लाखोंचे 'टर्न ओव्हर'.
🍉 सपाट(पडीक ) जमिनी लागवडीखाली आणल्यास उत्तम रोजगार.

  मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

 आपला जिल्हा विविध प्रकारच्या शेती- बागायती, पिके घेणारा म्हणून ओळखला जातो. शासनही त्यासाठी ब-या योजना, औजारे उपलब्ध करत आहे 
त्यात कलिंगड लागवडीतून खात्रीशीर उत्पादन नक्कीच मिळते.
 यंदा पर्जन्यमान समाधानकारक असून, येणारा मोसम हा त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. युवक, अनुभवी शेतकरी, आदींनी पुढाकार घेऊन, आपल्या गावात वेलवर्गीय  कलिंगड-चिबुड  लागवडीचा वेळीच निर्णय घेतला तर, आर्थिक स्थितीत चांगली भर निश्चित पडेल, असा विश्वास वाटतो.
 तश्या ब-याच कलिंगडाच्या प्रजाती आहेत.पण, शुगर बेबी, ऑगस्टा आदी प्रकारच्या जातींना मागणी असते.
 याचे हिवाळी व उन्हाळी असे दोन हंगाम असतात. पावसाळ्यात विशेषतः उत्पादन होत नाही. पहिला हंगाम आता सुरू होत आहे. साठ दिवसात फळ तयार होते.
मात्र, कलिंगड लागवड ही  चिकाटीने व एकत्रित पणे करणे गरजेचे आहे. यात नियोजनही महत्त्वाचे आहे. विविध कृषी संघ, कृषी अधिकारी, गट, कृषी मित्र आदींनी पुढे आल्यास, कलिंगडाच्या मागणीला प्रतिसाद देता येणे शक्य आहे.
 साधारण पणे नवरात्र - दसरा मुहूर्तावर पहिल्या  लागवडीचा आरंभ होतो. सुर्य प्रकाशाची प्रशस्त जागा, मुबलक पाणी, कुंपण , रस्ता ,राखण आदी गोष्टी अत्यावश्यक आहे.  गावातील अश्या जमिनीत सदर लागवड केली जाते.
 गत  हंगामात कलिंगडाला दरही चांगला मिळाला.जत्रा, उत्सव, मेळावे, व  हायवे- रस्त्यावरील स्टॉल आदीं ठिकाणी कलिंगडाला मागणी असते. काही जण, थेट बागेतूनच खरेदी करतात.
योग्य नियोजनातून व मार्गदर्शनातून यात जिल्ह्यातील युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध होईल यात शंका नाही.
गरज आहे ती पुढे येण्याची...!

 *फोटो* - कृपया कलिंगडाचा फोटो वापरणे.

Post a Comment

0 Comments