मालवण दिवाणी न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण १६३ प्रकरणे तडजोडीने निकाली .
नवप्रभात NEWS / मालवण
दिवाणी न्यायालय मालवण येथे 'राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मालवण येथील दिवाणी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी १५ प्रकरणे व वादपूर्व प्रकरणांतील १४७ प्रकरणे, तसेच पोलीसांकडील वाहतूक शाखेकडील ई-चलन १ प्रकरणे अशी मिळून एकुण १६३ प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली करणेत आली. प्रलंबित, वादपुर्व व ई-चलन मधील एकूण रक्कम रुपये ७,५२,७८२/- एवद्री झालेली आहे. या लोकन्यायालयामध्ये मालवण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत, महाराष्ट्र युज्य विज वितरण कंपनी तसेच वाहतुक पोलीसांमार्फत ई-चलन प्रकरणे अशा प्रकारची वादपूर्व प्रकरणे ठेवणेत आलेली होती
सदर लोकन्यायालयासाठी एक पॅनेल बनविणेत आलेले होते. पॅनेल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश, मालवण तथा तालुका विची सेवा समिती मालवणचे अध्यक्ष श्री. एम आर देवकते यांनी काम पाहीलेले असून, विधिज्ञ श्रीम पी यु गावकर यानी पॅनेल सदस्य म्हणुन काम पाहीले. तसेब न्यायालयाचे कर्मचारी सहायक अधीक्षक, श्री. एस. एन पालव, लघुलेखक, श्री डी डी तिबिले, वरिष्ठ लिपिक श्रीम यु. एन मालणकर, श्रीम. ओ ओ. चव्हाण व कनिष्ठ लिपिक श्री ओ जेस. हळदणकर, श्री एस. व्ही. परब, श्री.एल. आर कांबळी, श्री. सी. एम. गोसावी तसेच चपराशी श्री एस व्ही घारे, श्री. एस. ओ. चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments