Type Here to Get Search Results !

दिव्यांग कर्मचारी, त्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करा !परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दिव्यांग कर्मचारी, त्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करा !
परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नवप्रभात NEWS / कणकवली

राज्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग आणि इतर प्रमाणपत्रांबाबत केंद्र व राज्य सरकारकडून तपासणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राज्य शासन व जि. प.च्या सर्व दिव्यांग (अपंग) कर्मचारी, अधिकारी यांची दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच ते लाभ घेत असलेल्या शासनाकडील विविध सवलतींची तपासणी करावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अपंग कोट्यातून नव्याने नोकरीवर रुजू झालेले शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्याही प्रमाणपत्रांची व शारीरिक तपासणी

करणे आवश्यक असल्याचेही उपरकर यांनी नमूद केले असून निवेदनात म्हटले आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत शारीरिक तपासणी करून त्यांना दिलेल्या अपंगत्वाच्या टक्केवारीची खातरजमा करून घेण्याविषयी प्रशासनाकडून योग्य कार्यवाही करावी. गैरमार्गाने अथवा वशिलेबाजी करून वा खोटी प्रमाणपत्रे सादर करून दिव्यांग आयकर प्राप्तीकर व नोकरीतील विविध सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्यांवर वचक बसून शासनाच्या निधीचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. याबाबत आदेश देऊन कार्यवाही करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments