Type Here to Get Search Results !

मोदी आवास योजनेचे पावणेपाच कोटी गणेशोत्सवापूर्वी लाभार्थ्यांना न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा आमदार वैभव नाईक यांचा इशारा


मोदी आवास योजनेचे पावणेपाच कोटी गणेशोत्सवापूर्वी लाभार्थ्यांना न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा आमदार वैभव नाईक यांचा इशारा

नवप्रभात NEWS / कणकवली

मोदी आवास घरकुल योजना २०२३- २४ अंतर्गत सिंधुदुर्गातील १३०८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चार हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना घरासाठीची निर्धारित रक्कम दिली जाते. मात्र, या लाभार्थ्यांना केवळ पहिल्या हप्त्याची रक्कम सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारकडून उर्वरित तीन हप्त्यांची रक्कम न मिळाल्याने लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे घेऊन, कर्जे काढून अर्धवट असलेली घरे बांधून पूर्ण कैली. तरीही सरकारने लाभार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्याची एकूण ४ कोटी ७८ लाख ४० हजार रु. रक्कम दिलेली नाही. गणेशोत्सवापूर्वी ही रक्कम न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. शासनाच्या निधी प्रदान प्रणालीमध्ये निधीच उपलब्ध नसल्याने लाभाथ्यर्थ्यांच्या हक्काचे पैसे सरकारने थकीत ठेवले आहेत. एकीकडे सरकार निवडणुकीच्या तोंडावर नवीन योजना जाहीर करत आहे आणि दुसरीकडे घरकुल योजनेचे पैसे थकविले जात आहेत. जिल्हयातील ६३३ लाभार्थ्यांच्या दुसऱ्या हप्त्याची २ कोटी ८४ लाख रु. प्रलंबित आहे. ३०८ लाभाथ्याच्या तिसऱ्या हप्त्याची १ कोटी २३ लाख रु. आणि ३४५ लाभाथ्याच्या चौथ्या हप्त्याची ६९ लाख रु. रक्कम अशी सर्व मिळून ४ कोटी ७८ लाख ४० हजार रु. रक्कम सरकारने थकविलेली आहे. सरकारकडून लाभार्थ्यांर्वर झालेला हा अन्याय असून जर गणेश चतुर्थीपूर्वी लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या सर्व हप्त्यांचे पैसे मिळाले नाहीत, तर शिवसेना ठाकरे गटातर्फे लाभार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन छडण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments