आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी उद्यापासून राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा
नवप्रभात NEWS / मुंबई
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारपासून राज्यातील ९ जिल्ह्यांचा दौऱ्यावर रवाना होत आहेत. ४ ते १३ ऑगस्टपर्यंतच्या दौऱ्यात राज हे पक्षाचे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. राज यांच्या दौऱ्याला नवनिर्माण यात्रा असे नाव देण्यात आले आहे. या दौऱ्यात ते सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांत जाऊन आढावा घेणार आहेत.
Post a Comment
0 Comments