विनयभंग प्रकरणातील संशयिताची निर्दोष मुक्तता
नवप्रभात NEWS / मालवण
महिलेचा विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणातील संशयित वैभव रामचंद्र सावंत याची सबळ पुराव्याअभावी मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयिताच्यावतीने अॅड. उल्हास कुळकर्णी, अॅड. प्राची कुळकर्णी, अॅड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले. २२ नोव्हेंबर २०२० रोजी संशयित वैभव सावंत याने विनयभंग व धमकी दिल्याची तक्रार तक्रारदार महिलेने पोलिसात दिली होती. त्यानुसार वैभव सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी मालवण न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी देवकते यांच्यासमोर होवून संशयित वैभव सावंत याच्या विरुद्धचा गुन्हा सबळ पुराव्याअभावी शाबित होवू न शकल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
Post a Comment
0 Comments