Type Here to Get Search Results !

संजय गांधी निराधार समिती बैठकीत कुडाळ तालुक्यातील १८८ प्रकरणांना मंजुरी... देवेंद्र सामंत यांची माहिती

संजय गांधी निराधार समिती बैठकीत कुडाळ तालुक्यातील १८८ प्रकरणांना मंजुरी... देवेंद्र सामंत यांची माहिती

  मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे बुधवारी झालेल्या संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष देवेंद्र सामंत यांनी दिली. या संदर्भातील बैठक तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे झाली. या बैठकीत कुडाळ तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच विधवा निराधार महिला भगिनींचे एकूण १८८ प्रस्ताव दाखल झाले होते, यावर या बैठकीतं विचारविनिमय करून सर्वच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

अद्याप ज्या निराधार बांधवांनी या योजनेसाठी प्रस्ताव सादर केला नाही, त्यांनी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष देवेंद्र सामंत यांनी केले. या बैठकीसाठी तहसीलदार वीरसिंग वसावे, श्रीमती ठाकूर, कुडाळ अ. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य अदिती सावंत, सायली कुडाळकर, वृनाल कुंभार, संदेश नाईक, अनिल शिंगाडे, गोपाळ हरमलकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments