Type Here to Get Search Results !

पेट्रोल पंपासाठी परवाना देतो सांगून केली ऑनलाईन फसवणूक

पेट्रोल पंपासाठी परवाना देतो सांगून केली ऑनलाईन फसवणूक

  योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 


वेंगुर्ले तालुक्यातील आरवली- बांधवाडी येथील देवदत्त मंगेश चव्हाण यांना २०२३ ते मे २०२४ या मुदतीत अज्ञाताने फोन केला. आपण संबंधित कंपनीतून बोलत असून तुम्हाला पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी परवाना देतो, असे सांगितले. त्यानंतर त्या अज्ञाताने संबंधित कंपनीच्या फेक मेलद्वारे बनावट कागदपत्रे व परवाना चव्हाण यांना पाठविला. यासाठी त्या अज्ञाताने चव्हाण यांच्याकडे २ लाख २८ हजार १८ रुपयांची मागणी केली. चव्हाण यांनी सदर रक्कम ऑनलाईन पद्धतीने त्या अज्ञातांला पाठविली. त्यांनतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी वेंगुर्ले पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments