सर्वर प्रॉब्लेम दाखवून नागरिकांना धान्यापासून वंचित ठेवले जातंय... काँग्रेसचा गंभीर आरोप
नवप्रभात NEWS / ओरोस
सर्वर प्रॉब्लेम दाखवून गरजू नागरिकांना हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवण्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला आणि याबाबत सर्वरच्या प्रॉब्लेममुळे जिल्ह्यातील धान्य वितरणात अडथळे निर्माण होत असल्याने काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तातडीने ऑफ लाईन धान्य देण्यासंदर्भात रूट अधिकारी नेमून निर्णय घेण्यात येत असून मंगळवार पासून ऑफ लाईन धान्य मिळण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच ज्यांना या महिन्यात धान्य मिळणार नाही त्यांना मुदतवाढ देण्यात येईल व पुढील महिन्यात धान्य वितरण करण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन व ऑनलाईन धान्य वितरणात अडथळे निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले. यावेळी प्रकाश जैतापकर, नागेश मोर्ये, विजय प्रभू, विधाता सावंत, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत - परुळेकर, अंकुश मलबारी, प्रथमेश परब, मयूर आरोलकर, तरबेज शेख, किरण टेंबुलकर, विनायक मेस्त्री, बाबा काझी विजय सावंत आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, सर्वर प्रॉब्लेम दाखवून गरजू नागरिकांना, हक्काच्या रेशन धान्यापासुध वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला. सद्यः परिस्थितीत या महिन्याच्या २४ तारखेपासून सर्व्हर प्रॉब्लेममुळे धान्य वितरण पूर्णपणे ठप्प झालेले आहे. यामुळे सामान्य गरजू रेशनधारकांना दिवसातून ४ वेळा दुकानात येऊन जावे
लागत आहे. शासनाने ऑफलाईनची सुविधाही पूर्णपूर्ण बंद केलेली आहे. धान्य वितरणासाठी फक्त ३ दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. या दिवसात कशा पद्धतीने धान्य वाटप करायचे? कारण अद्यापपर्यंत सर्व्हर चालू झालेला नाही.
या दोन दिवसात सव्र्व्हर चालू न झाल्यास सरासरी आपल्या जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानाचे ७० ते ८०% लोक धान्यापासून वंचित राहतील, ही गांभीर्याची बाब आहे. तरी आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन ज्यावेळी महिन्याच्या अखेरीस सर्व्हरची अशी परिस्थिती शेवटच्या पंधरवड्यात निर्माण झाल्यास शासनाने धान्य दुकानदारांना ऑनलाईन मिळत असलेल्या मार्जिनसहीत ऑफलाईन देण्याचा लेखी आदेश देऊन ग्राहकांचे हक्काचे असलेले धान्य देण्याची व्यवस्था करावी. असे न झाल्यास सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
Post a Comment
0 Comments