Type Here to Get Search Results !

केळुस-कालवीबंदर येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, समर्पण फाऊंडेशनचे आयोजन

रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचा सन्मान करताना जिल्हा रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी सुरवसे. बाजूला पदाधिकारी व रक्तपेढीची टीम.

  योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग व कालवीबंदर ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या कालवीबंदर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

कलवीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र पराडकर व समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर यांच्या हस्ते झाले.  समर्पणचे उपाध्यक्ष सलील नाबर, सचिव महेंद्र मातोंडकर, समर्पणचे कुडाळ तालुका अध्यक्ष गजानन मुणनकर, सहसचिव सुहास खोबरेकर, संघटक शैलेश भोसले, सहखजिनदार समीर घाटे, जिल्हा रक्तपेढीच्या तंत्रज्ञ कांचन परब, ऋतुजा हरमलकर, परिचर प्रथमेश घाडी, मदतनीस सुरेश डोंगरे, वाहनचालक नितीन गावकर, तसेच कालवीबंदर ग्रामस्थ मंडळाचे गोविंद केळुसकर, सुरज शिवलकर, पांडुरंग शिवलकर, महेश नागवेकर, बाबुराव ताम्हणेकर, साईश गोकरणकर, रवींद्र पराडकर, जयदेव केळुसकर, नंदकुमार जोशी, नागेश आरोलकर, रामचंद्र ताम्हणकर, प्रमोद केळुसकर, प्रणीता केळुसकर, श्रद्धा ताम्हणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या शिबिरात ३६ दात्यांनी सहभाग घेतला तर प्रत्यक्ष २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. वायंगणी गावच्या तलाठी तथा केळुस-कालवीबंदरच्या सुकन्या गौरी पराडकर यांनी सर्वप्रथम रक्तदान करून प्रत्यक्ष शिबिराचा शुभारंभ केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश नागवेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments