Type Here to Get Search Results !

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड येथे २९ रोजी 'युवासेना भजन स्पर्धा'

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड येथे २९ रोजी 'युवासेना भजन स्पर्धा'

नवप्रभात NEWS / देवगड

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुका शिवसेना, युवासेनेतर्फे २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे रक्तदान शिबीर व देवगड तालुका मर्यादित 'युवासेना भजन स्पर्धे' चे आयोजन करण्यात आले आहे.

युवासेना चषक भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला १५ हजार १११, सन्मानचिन्हं, द्वितीय १० हजार १११ रु. व सन्मानचिन्ह, तृतीय ५

हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ २१११ व सन्मानचिन्ह व वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतील. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १५ संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहेत. नाव नोंदणीसाठी गणेश गावकर (९७७३२७२३३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकुर, सायली घाडीगावकर, गणेश गावकर, फरीद काझी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments