Type Here to Get Search Results !

कुडाळ एमआयडीसी येथील सामाईक सुविधा केंद्राकडील परिसरात सुरुचे झाड पडून नुकसान

कुडाळ एमआयडीसी येथील सामाईक सुविधा केंद्राकडील परिसरात सुरुचे झाड पडून नुकसान

मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

कुडाळ एमआयडीसी येथील सामाईक सुविधा केंद्राकडील परिसरात बुधवारी सायंकाळी आलेल्या, वादळी वाऱ्यासह पावसाने रस्त्यावरील सुरूचे झाड उन्मळून पडल्याने विजेचे पोल तुटून पडले व तेथील सुकी यांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे.

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने एमआयडीसी येथील सामाईक सुविधा केंद्राकडील परिसरात सुरुचे मोठे झाड उन्मळून विद्युत पोलावर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला तसेच तेथील सुकी यांच्या घरावर देखील झाड पडल्याने त्यांच्या घराच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले आहे.
मात्र यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
लागलीच अग्निशमन दलाच्या मदतीने तसेच स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आले.

Post a Comment

0 Comments