होडावडे येथे पडण्याच्या स्थितीत असलेल्या विद्युत पोलमुळे वाहनधारक व पादचाऱ्यांच्या जीवितास धोका
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे कवडासवाडी येथील रस्त्यावर पडण्याच्या स्थितीत असलेल्या विद्युत पोलमुळे वाहनधारक व पादाचार्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
होडावडा कवडासवाडी चार वर्षांपूर्वी ट्रांसफार्मर वीज वितरण कंपनीकडून मंजूर झाला होता त्यावेळी संबंधित ठेकेदाराने सदर रस्त्याच्या बाजूने विद्युत पोल उभे करून ठेवले आहेत परंतु सदर ट्रान्सफॉर्मर रद्द झाल्याने विद्युत फोल त्या ठिकाणी उभे केलेले आहेत या मार्गावरील दशरथ चव्हाण यांच्या घराशेजारील पुरलेला फोल पूर्णता रस्त्यावर कलंडलेला असून तो कोणत्याही क्षणी रस्त्यावर पडून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
गेल्या पाच सहा दिवसापासून धोकादायक स्थितीत असलेला हा फोल हटविण्या बाबत कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे गावातील लोकप्रतिनिधी व संबंधित ठेकेदार आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी या ठिकाणी अपघाताची वाट पाहत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Post a Comment
0 Comments