कुडाळ हिर्लोक-किनळोस ग्रामपंचायत येथे शेतकरी माहिती केंद्राचे उद्घाटन
नवप्रभात NEWS / कुडाळ
कुडाळ तालुक्यातील मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमाअंतर्गत हिर्लोक-किनळोस ग्रामपंचायत येथे शेतकरी माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले
शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यास उपयुक्त अशी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून हा उपक्रम विकसित केला असून त्यामध्ये शेतकर्यांना उपयुक्त माहिती , डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुचवलेल्या पिकांच्या अनुषंगाने देण्यात आली. यावेळी उपस्थित त्यांना शेती विषयक विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.
ग्रूप ग्रामपंचायत हिर्लोक - किनळोसच्या सरपंच सौ प्राची संदीप सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या शेतकरी माहिती केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे प्राध्यापक डॉ. गिरीश ऊईके,डॉ. जया वाघ, डॉ. विजय पाळसांडे,SRT शेतकरी पुरस्कार सन्मानित श्री. रामचंद्र ( नाना) सावंत, मा. श्री. सुनील सावंत,कु. मृण्मयी जयंत सूर्वे(गट प्रमुख) कु. सानिका पुंडलिक चव्हाण,कु. वरदा सुनील चव्हाण,कु. आर्या दिलीप गायकवाड,कु. साक्षी बाबू गोरीवले व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, हिर्लोक गावचे ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments