Type Here to Get Search Results !

संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश द्या

संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश द्या

नवप्रभात NEWS / मालवण

 ढगफुटी सदृश पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्याठिकाणी पाठवून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी केली.

गेल्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागांत जोरदार ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली. यामुळे घरांमध्ये पाणी जाऊन पडझड झाली आहे.

वादळी पावसाने शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ याबाबत ग्रामीण भागात तलाठी व संबंधित अधिकारी यांना पाठवून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मोंडकर यांनी केली आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील तहसीलदारांनी केलेल्या पाहणीचा अहवाल तत्काळ मागवून घ्यावा व येत्या आठ दिवसांत नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments