Type Here to Get Search Results !

हुमरमळा येथील रामेश्वर मंदिराचे पुजारी जनार्दन ऊर्फ गुरु वसंत गुरव यांचे निधन.

.

 हुमरमळा रामेश्वर मंदिराचे पुजारी जनार्दन ऊर्फ गुरु वसंत गुरव यांचे निधन.


   मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

 कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी जनार्दन ऊर्फ गुरु वसंत गुरव (५८ ) यांचे उपचारा दरम्यान कुडाळ येथील खासगी रुग्णालयात शुक्रवारी  निधन झाले.
   गुरू यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 
मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही.  
ते रामेश्वर मंदिराचे पुजारी म्हणून काम करत होते. वडील कै.वसंत ऊर्फ तात्या गुरव यांच्या पश्चात, त्यांनी रामेश्वर मंदिरात भाविकांचे सांगणे देणे, प्रसाद लावणे, धार्मिक विधी, नित्य पूजा, वार्षिक उत्सव आदी कार्य यथासांग पार पाडले. ते शेतीही करीत होते. 
शेतीतुन घरी आल्यावर त्यांना अस्वस्थता जाणवु लागली.   लागलीच त्यांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावली.त्यातच त्यांचे  शुक्रवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी , ,मुली, भाऊ, भावजयी, पुतणे, पुतणी  असा परिवार आहे. कुडाळ येथील मेडिकल रिप्रेझेटीटीव्ह ( एम.आर.) संतोष गुरव, तसेच हुमरमळा येथील संजय गुरव यांचे ते जेष्ठ बंधू होत. 

Post a Comment

0 Comments