Type Here to Get Search Results !

मालवण बस स्टॅन्ड येथील रस्त्यावर साटणाऱ्या पाण्याची समस्या दूर करा.. जिल्हा युवक काँग्रेसची नगरपालिकेकडे मागणी

मालवण बस स्टॅन्ड येथील रस्त्यावर साटणाऱ्या पाण्याची समस्या दूर करा जिल्हा युवक काँग्रेसची मागणी

नवप्रभात NEWS / मालवण 

मालवण बस स्टॅन्ड येथे पावसाळी पाणी जाण्यासाठी आर.सी.सी क्रॉस गटार बांधून रस्त्यावरील पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी मालवण नगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 भरड मालवण बस स्टॅण्ड ते रेडकर हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या मोऱ्या बुजल्या असल्याने येथे पावसाचे साटणारे पाणी हे रस्त्यावर येत आहे त्यामुळे त्या परत खोदून पाण्याचा मार्ग बदलून व आर. सी. सी. बांधकाम करुन देऊळवाडा पुलापर्यंत पाणी सोडण्यात यावे. तसेच टुरिस्ट लॉज हॉटेल समोरील तात्पुर्ती पाईप बंद असल्यामुळे क्रॉस पाणी वाहत नाही. त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे पदचारी यांच्यावर ये-जा करणाऱ्या गाड्यांचे पाणी अंगावर उडत आहे. तरी गणेश चतुर्थीपुर्वी क्रॉस (आर. सी. सी.) मोरीचे काम करुन पाणी मार्गस्थ करत येथील पाण्याची समस्या तात्काळ दूर करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अरविंद मोंडकर, सदस्य जेम्स फर्नांडिस,देवानंद लुडबे, बाबा मेडिस, योगेश्वर कुर्ले, श्रेयस माणगांवकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments