Type Here to Get Search Results !

सौ. अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून तुळस गावातील दहा शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रम संपन्न.

अर्चना फाऊंडेशन मार्फत तुळस गावातील 10 शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

   उमेश कुंभार
नवप्रभात NEWS 

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट च्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे- परब यांच्या माध्यमातून तुळस येथील दहा शाळांमध्ये वाह्या वाटप करण्यात आले. यामध्ये श्री शारदा विद्यालय तुळस कुंभारटेंब, श्री शिवाजी हायस्कूल तुळस, श्री स्वामी विवेकानंद विद्यालय तुळस फातरवाडा, श्री गिरोबा विद्यालय तुळस, श्री सरस्वती विद्यालय पलतड, श्री वेताळ विद्यामंदिर तुळस, केंद्र शाळा जैतीर विद्यालय तुळस, जय हिंद विद्यालय तुळस फासतळी, श्री दत्त विद्यालय रेवटी तुळस, गोवर्धन विद्यामंदिर तुळस वडखोल या शाळांचा समावेश आहे.
 याप्रमाणे तुळस गावातील सर्व शाळांमध्ये वाह्या वाटप  करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट चे तुळस विभाग प्रमुख अवधूतजी मराठे यांनी मुलांना चांगले मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांच्या सोबत बूथ अध्यक्ष उमेश कुंभार, ग्रामपंचायत सदस्या स्वाती सावंत,अदिती चुडजी, विजय शिरोडकर, ग्रा. सदस्या मयुरी बरागडे,पुनम परब,पंढरी नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट चे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सर्व शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांनी अर्चना घारे- परब यांचे आभार मानले व त्यांचे सामाजिक राजकीय कार्य असेच निरंतर राहुदेत तसेच विद्यार्थांना वह्यांचा दुरुपयोग न करता त्यांचा शिक्षणासाठी योग्य प्रकारे वापर करण्यास सांगून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments