वडाचे झाड अंगावर पडून तळवडे येथील विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील जनता विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कु.सायली सतीश धुरी वय - १७ रा. मीरीस्तेवाडी तळवडे हिच्यावर वडाचे झाड उन्मळून पडल्याने तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना आज मंगळवारी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास तळवडे येथे घडली. कु.सायली कॉलेजमधून मैत्रिणींसह घरी परतत होती. यावेळी ही घटना घडली. या घटनेत तिच्या मैत्रिणी मात्र सुदैवाने बचावल्या. दरम्यान या घटनेत विजेच्या ताराही जमिनीवर तुटून पडल्याने कु.सायली हिचा मृत्यू विद्युत वाहिन्यांच्या स्पर्शाने झाला की झाड अंगावर पडल्यामुळे झाला हे नेमके समजू शकले नाही.
तिचे वडील सतीश धुरी यांचा होडावडे येथे बाजारपेठ मध्ये पान पट्टी चा स्टॉल असुन या घटनेची माहिती मिळताच तिचे काका तसेच शाळेतील शिक्षक व गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
Post a Comment
0 Comments