नवप्रभात NEWS / ओरोस
मालमत्तेस व मानवी जीवितास धोका पोहोचेल अशी बॉम्बसदृश्य स्फोटके बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी राजू जयराम पवार (४०) रा. सौंदाळे, बाऊलवाडी देवगड याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळून लावला आहे.
सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथे एका तलावाच्या नजिकच्या जमिनीत दोघेजण गावठी बॉम्ब ठेवण्यासाठी आले होते. हा प्रकार संबंधित जमीन मालक जयराम वारंग यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात ९ गावठी बॉम्बसदृश्य वस्तू (स्फोटके) जप्त केले होते. ८ मार्च २०२४ रोजी वारंगाची तुळसुली येथील झगुडले तलावाकडे ही घटना घडली होती.
या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी मानवी जीवितास व मालमत्तेस धोका पोहोचवणारी स्फोटके बाळगल्याप्रकरणी राजू जयराम पवार (४०) रा. सौंदाळे देवगड व त्याच्या सोबत एक अल्पवयीन मुलगा अशा दोन संशयितांवर स्फोटक अधिनियम १९०८ चे कलम ४, ५ व भा. दं. वि. कलम २८६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तर राजू पवार याला याप्रकरणी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर तो ११ मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, देवगड ,बांदा ,दोडामार्ग, तरळे ,मालवण ,फोंडा ,ओरोस, सातार्डा ,शिरोडा ,आरोंदा, कुडाळ, माणगाव, कणकवली , आंबोली, सावंतवाडी प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments