आरोस स्पोर्ट्स संघ तुळस येथील राष्ट्रवादी चषक २०२४ चा महाविजेता
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजीत तुळस येथील एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेत आरोस स्पोर्ट्स संघ राष्ट्रवादी चषक २०२४ चा महाविजेता ठरला तर श्री राम वॉरियर्स वडखोल संघाने उपविजेतापद पटकावले.
वेंगुर्ला तुळस जकात नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष संदिप पेडणेकर यांच्या संकल्पनेतून आयोजीत राष्ट्रवादी चषक २०२४ एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचे अयोजन कऱण्यात आले होते. गेले तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्हयातील १६ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर स्पर्धेत जिल्हयातील दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. कर्णधार बबल नाईक यांच्या नेतत्वाखालील आरोस स्पोर्ट्स विरुद्ध कर्णधार अजित परब यांच्या श्री राम वॉरियर्स वडखोल यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात आरोस स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकावले.
सदर स्पर्धेतील विजेत्या संघाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या हस्ते रोख रुपये २५ हजार व चषक, तसेच उपविजेत्या संघास रोख रुपये १५ हजार रुपये व चषक देऊन गौविण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव सुशील चमणकर, जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण, तालुका अध्यक्ष संदिप पेडणेकर, शहर अध्यक्ष सुरज परब, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, होडावडा ग्राम पंचायत सदस्य संदिप सातार्डेकर , आनंद माळकर, कृषीसेल तालुका अध्यक्ष श्यामसुंदर राय, अजय नाईक, बाबा तेली, मंदार तुळसकर,पर्यटन विकास सोसायटी सचिव गणपत केळुस्कर, संचालक मोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments