Type Here to Get Search Results !

स्त्री हाच कुटुंब व्यवस्थेचा कणा - प्रा.वैभव खानोलकर

स्त्री हाच कुटुंब व्यवस्थेचा कणा - प्रा.वैभव खानोलकर

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

प्रत्येक मनुष्य हा समाजाचा एक घटक आहे. हे प्रत्येकाने जाणून त्यानुसार सामाजिक बांधिलकी जपली नाही, जबाबदारी ओळखून वागले नाही तर सामाजिक प्रश्न निर्माण होऊन समाज व्यवस्था बिघडून जाते. आजचा समाज बर्‍याच अंशी भरकटत चालला आहे. याचे मूळ कारण म्हणजे समाज ज्यांच्या एकत्र येण्याने बनला आहे ती कुटुंबे योग्य मार्गावर नाहीत. कौटुंबिक व्यवस्था पार बिघडल्यामुळे अनेक कौटुंबिक प्रश्‍न, समस्या निर्माण झाल्या आहेत. कुटुंबाचा घटक असलेल्या प्रत्येक माणसाला त्या समस्यायुक्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.अर्थात स्री हा कुटुंब व्यवस्थेचा कणा असुन सध्या स्थितीत आज कुटुंब व्यवस्थेला सावरणं हे केवळ तिच्याच हातात असल्याचे मत प्रा.खानोलकर यांनी को.ए.सो.लोकनेते ॲड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या तुळस येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमदान शिबीरातील वैचारिक मंथनात माडले. या व्याख्यान मालेत समाधानी कुटुंब हा विषया वर त्यांनी भाष्य केले महाराष्ट्र गोंवा राज्यात आपल्या अभ्यास पूर्ण वैचारिक मंथनासाठी प्रसिद्ध असणारे प्रा. वैभव खानोलकर यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत उपस्थित विद्यार्थी वर्ग आणि प्राध्यापक याची माने जिकली.
कालानुरूप झालेल्या परिस्थिती बदलामुळे, आचार-विचार यांमधील बदलांमुळे एकत्र कुटुंब पद्धतीला फाटा मिळून विभक्त कुटुंब पद्धत समाजात अधिक प्रमाणात रूढ झाली आहे. एकत्र कुटुंब कर्त्या पुरुषाला कुटुंब प्रमुख मानून त्याच्या मतानुसार, निर्णयानुसार घर चालायचे. कुटुंबात त्याचा धाक-शिस्त असायची. दोन-तीन पिढ्या त्यात एकत्र नांदायच्या. त्यामुळे लहान मुलांना त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, आत्या-काका यांचं प्रेम, माया, आपुलकी मिळायची. आजी-आजोबांना आपल्या नातवंडांचा इतका लळा लागायचा की त्यांना कोणी बोललं, ओरडलं तरी त्याची खंत नसायची. मुलांना चांगले काय, वाईट काय.. या गोष्टीचे ज्ञानामृत त्यांच्या आई-वडिलां शिवाय आजी-आजोबा, काकी-काका यांच्याकडूनच मिळायचं. भावडांमध्ये प्रेमानं, मायेनं एकत्र नाचणं, बागडणं, जिवाला झेपेल तेवढं काम करणं या स्वभाव प्रवृत्ती निर्माण होऊन त्या जपल्या जायच्या.!
कुटुंबातील कोणीही असो, त्याच्या गरजा भागवणं, त्याचे प्रश्न सोडवणं याची जबाबदारी कुटुंबप्रमुखाची.  कुटुंबावर एखादी आपत्ती आली, गंभीर समस्या निर्माण झाली तर त्यावेळी कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येऊन परिस्थितीला सामोरं जाणं, हे एकत्र कुटुंबात प्रत्येकाचं कर्तव्य असायचं. त्यामुळे कुणा एकावरती ताण येत नव्हता. सगळी कशी मिळून-मिसळून रहायची. कौटुंबिक एकतेच्या परस्परांशी असलेल्या नात्याच्या अनुबंधानी घट्ट बांधलेली असायची. त्यामुळे एकमेकांप्रति प्रेम होतं, जिव्हाळा होता, माया होती, चिंता होती तशी सहृदयतेची भावनाही तेवढीच दृढ होती. कुटुंबाचे व्यवहार अनेक असायचे. प्रत्येकाची जबाबदारी वेगळी. अशी पद्धतशीर व्यवस्था असल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत ही कुटुंबासाठी पौषकच ठरलेली आहे. आज कालानुरूप परिस्थिती एवढी झपाट्याने बदलत चालली आहे की प्रत्येकाचे विचार वेगळे, आचार वेगळे, संस्कार वेगळे, वर्तणूक वेगळी, त्यामुळेही मतेही वेगळी. एकत्र कुटुंबात रहायचे म्हटले तर बंधने आलीत, कर्तव्य-पालन आलं, शिस्त आली, जबाबदारी आली अन् कुटुंबाला अभिप्रेत असलेली मिळून-मिसळून-सर्वांशी जुळवून घेऊन वागण्याची स्वभाव प्रवृत्ती आली. आज अशी बंधनं माणसाला नको आहेत. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धतीने समाजात घट्ट मूळ धरले आहे.

मन मानेल तसे स्वैर, स्वच्छंद, धुंद, मस्त जीवन जगण्यातच आज माणसाला विशेष रस आहे. किंबहुना तेच आपलं खरं जीवन आहे अशी त्याची धारणा बनली आहे विभक्त कुटुंबात आई-वडील आणि मुले किंवा एक मूल, एवढेच घटक. वडील नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर. आई शिक्षित असल्यामुळे घरी कंटाळा येतो म्हणून नोकरी करते. परिणामी मुलावर काय संस्कार कररायला वेळ नसतो
मुलगा/मुलगी मोठी होऊन शाळेत जायला लागले, प्राथमिक शिक्षण झाले की माध्यमिक शिक्षणाच्या कालखंडात त्याला मुक्त जीवनाचा छंद जडतो. त्यावेळी मित्र-मैत्रिणींच्या संगतीमुळे आईवडलांपासून नकळत ती दूर लोटली जातात. घरात आईवडील आणि मुलगा- मुलगी यांच्यामध्ये मतभिन्नता, वाद यामुळे कौटुंबिक अस्वस्थता अन् वेळप्रसंगी संघर्ष निर्माण होतो. 
आई-वडील यांच्यामधील वैचारिक मतभेद हे मुलांना कळतात. त्यांचीही मनःस्थिती बिघडते. त्यामुळे प्रत्येकाचा जीवनमार्ग वेगळा, स्वतंत्र बनतो. पुढे मुलो लग्न झालं की तो आपला संसार थाटतो. सहचारिणी मिळाली की काही वर्षानंतर आई-वडील ज्येष्ठ नागरिक बनतात. तेव्हा काहींची रवानगी वृद्धाश्रमात करणे मुलं पसंत करतात. अशा पद्धतीने कौटुंबिक विभक्तपणाची ही साखळी वाढतच जाते.
विभक्त कुटुंब पद्धती मुळे कौटुंबिक नाती-गोती नष्ट होत चालली आहेत, नात्यांचे अनुबंध तुटत आहेत ही खंत करण्यासारखी, गंभीर बाब आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था आज कोलमडली आहे. ती वेळीच सावरायला हवी. नाहीत जगासाठी आदर्श भारतीय कुटुंब व्यवस्था उध्वस्त होईल कुटुंबे सुखी झाली तर समाज सुखी होईल. कौटुंबिक व्यवस्था सुधारली तर सामाजिक व्यवस्था सुधारून समाज जीवन पोषक, हितकारक व सुखमय होईल! माणसाचे संसारी जीवन सुखी, आनंदी होण्यासाठी कौटुंबिक प्रश्नांवर मात करायला हवी. त्यासाठी कोलमडत असलेली कुटुंब व्यवस्था…ती सावरण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्या गरजा जर माणसाने कमी केल्या तर पैशांच्या मागे त्याला धावावे लागणार नाही. म्हणजे मग कुटुंबासाठी त्याच्याकडे वेळ राहील. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक घटकाने – ‘‘एकमेकांना जाणून घेऊ, एकमेकांशी जुळवून घेऊ, एकमेकांना साह्य करू, एकमेकांना सुखी-आनंदी करू’’… या मूलमंत्राचा ध्यास घेऊन तो आचरणात आणायला हवा. बदलत्या काळाची ती एक मोठी गरज आहे.आणि हे कुटुंब व्यवस्था योग्य वळणावर आणण्याची किमया केवळ नारी शक्ती करू शकते
या वेळी व्यासपीठवर प्रा.डॉ पूजा कर्पे,विद्यार्थी प्रातिनिधि उपस्थित होते .



        🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments