कोकण शिक्षक मतदार संघाचे मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूल ना प्रोजेक्टर मंजुर
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
मा.आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभेतील हायस्कूल व महाविद्यालय यांना मंजूर झालेल्या प्रोजेक्टरचे वाटप बुधवार दिनांक 6 मार्च रोजी दु. 3.30 वाजता
भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालय - गवळी तिठा , सावंतवाडी येथे मा. आम. राजन तेली यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या प्रसंगी श्री वामन तर्फे (अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ) ,श्री.गुरुदास कुसगांवकर सचिव; ,
श्री.रामचंद्र घावरे उपाध्यक्ष ,
माजी मुख्या. संघ जिल्हाध्यक्ष मा. एम. जी. मातोंडकर सर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सावंतवाडी तालुक्यातील ३५ हायस्कूल , वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल व दोडामार्ग तालुक्यातील १६ हायस्कूल अशा प्रकारे सावंतवाडी विधानसभेतील ६७ हायस्कूल व महाविद्यालयांना प्रोजेक्टर मंजूर केल्यामुळे विद्यार्थी , शिक्षक व संस्थाचालक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी या कार्यक्रमास सावंतवाडी विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकाऱी , सुपर वाॅरीयर्स , बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे , असे आवाहन करण्यात येत आहे .
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments