नवप्रभात NEWS / आजरा
संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा ! - आजरा येथे पोलीस आणि प्रशासन व तहसीलदार कार्यालय यांना निवेदन
आजरा (जिल्हा कोल्हापूर) - पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी अनेक युवकांना दिशा देऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कृतिशील केलेले आहे. अशा ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असलेल्या पू. भिडेगुरुजी यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा, तसेच त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे. मनमाड (जिल्हा नाशिक) येथे २९ फेब्रुवारीला काही माथेफिरूंनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्याचा गंभीर प्रकार केला. तरी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्यांचा मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आजरा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आजरा व सर्व हिंदुत्ववादी यांच्या कार्यकर्त्यांनी आजरा वतीने
या प्रसंगी सर्वश्री प्रथमेश काणेकर संदीप पारळे चेतन बुरुड उमेश परपोलकर सतीश शिंदे विशाल नाईक सतीश पवार ऋषी सावंत सुयोग बेळगुंदकर आदी उपस्थित होते.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments