नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या पुण्यभूमीवर ३० वा देवता स्थापना दिन (वर्धापन दिन) २० मार्च आमलकी एकादशी ते गुरुवार २१ मार्च व्दादशी दिन या दोन दिवशी होत आहे.
यानिमित्त २० रोजी सकाळी ७ वाजता नित्यपूजा, सकाळी ९ वाजता आवळी वृक्षपूजन, दुपारी १.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ६.३० वाजता धुपारती, पालखी प्रदक्षिणा, सायंकाळी ७ वाजता श्री दत्तमाऊली दशावतार लोककला सिंधुदुर्ग आयोजित 'वीर चक्राचा पण' हा नाट्यप्रयोग होणार आहे.
गुरुवार २१ मार्चला सकाळी ७ वाजता नित्यपूजा, सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, पालखी प्रदक्षिणा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ७ वाजता नाट्यमंडळ, ओमकार दशावतार म्हापण यांचा 'बालकनाथ' नाट्यप्रयोग असे कार्यक्रम निश्चित आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांनी केले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments