Type Here to Get Search Results !

पेडणे कासारवर्णेतील अपघातात दोडामार्ग येथील युवतीचा मृत्यू ..दुसरा दुचाकीस्वार गंभीर

पेडणे कासारवर्णेतील अपघातात दोडामार्ग येथील युवतीचा मृत्यू  
..दुसरा दुचाकीस्वार गंभीर

नवप्रभात NEWS / म्हापसा 

 गोवा - पेडणे तालुक्यातील कासारवर्णे येथे आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात सुजाता सुरेश सातार्डेकर (२५) या कळणे-दोडामार्ग (सिंधुदुर्ग) युवतीचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसऱ्या दुचाकीवरील फैझल फ्रान्सिस मास्कारेन्हस (२५) हा हंसापूर येथील कॉलेज युवक गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी त्याला म्हापसा येथील जिल्हा स्रणालयात दाखल करण्यात आले आहे.
 विमानतळावर मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता सातार्डेकर युवती मोपा येथील नोकरीला होती. रात्रपाळी संपल्यावर सकाळी ती आपल्या दुचाकीने (एमएच ०७ एटी ११५०) कळणे-दोडामार्ग येथे घरी जात होती. कासारवर्णे येथे पोहोचल्यावर तिच्या दुचाकीपुढे असलेल्या कारला ओव्हरटेक करण्याचा तिचा अंदाज
चुकला आणि समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीला तिची जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की सुजाताच्या हेल्मेटचे तुकडे तुकडे झाले. परिणामी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्युमुखी पावली

मोपाचे पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक हळदणकर व साहाय्यक उपनिरीक्षक मधुकर मळीक यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.


        🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments