Type Here to Get Search Results !

जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सांगेली नवोदय विद्यालयाला भेट.

जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सांगेली नवोदय विद्यालयाला भेट.


नवप्रभात NEWS / सावंतवाडी 


सौम्य डोकेदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ किंवा फुगणे ही अन्न विषबाधाची सामान्य लक्षणे आहेत जी दूषित अन्न खाल्ल्यानंतर काही तासांत सुरू होऊ ...अन्न विषबाधा आणि फ्लूच्या लक्षणांमध्ये गोंधळून जातात. पण या दोघांच्या लक्षणांमधील मुख्य फरक म्हणजे अन्न विषबाधा झाल्यास सुरुवातीलाच खूप घाम येतो. दुसरे एक लक्षण म्हणजे ओटीपोटात तीव्र दुखणे आणि पेटके येणे आणि शौचास सुरुवात होणे. यावेळी पोटात जास्त गॅस तयार होण्याची समस्या देखील होऊ शकते.विषबाधाची लक्षणे सुरू होण्यास वेळ लागू शकतो. आजार बऱ्याचदा 1 ते 3 दिवसात सुरू होतो. परंतु दूषित अन्न खाल्ल्यानंतर 30 मिनिटांपासून 3 आठवड्यांपर्यंत लक्षणे कधीही सुरू होऊ शकतात. हा आजार कोणत्या जीवाणू किंवा विषाणूच्या प्रकाराचा आहे यावर लक्षणांची तीव्रता  अवलंबून असते. उलट्या किंवा अतिसाराद्वारे होणं ही  पचनसंस्थेतून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी शरीरासाठी ही एक यंत्रणा आहे.जुने किंवा कुजलेले अन्न,न धुतलेले सेवन,
पुरवठा साखळीत खराब, हाताळणी,अयोग्य स्वयंपाक,
अयोग्य स्टोरेज यामुळे अन्न दुषित होऊ शकते या बाबतीत विद्यालयाच्या आरोग्य व अन्न समिती यांनी योग्य ती काळजी घेतल्यास याला प्रतिबंध करता येईल असं जनसेवा प्रतिष्ठान,  जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल अध्यक्ष व कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या न्यायवैद्यक विषशास्त्र शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव लिंगवत यांनी नवोदय विद्यालय सांगेली येथे प्राचार्य एम् . के. जगदीश यांच्या भेटी दरम्यान केले. अलीकडेच केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालय सांगेली येथील विद्यार्थी यांना अन्न विषबाधा होऊन जवळपास एकशे साठ विद्यार्थी बाधीत झाले होते, वेळीच वैद्यकीय यंत्रणा, पालक व ग्रामस्थांनी सतर्कता बाळगल्याने वेळीच उपचार करून विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले. या बाबतीत सविस्तर चर्चा करून डॉ.संजीव लिंगवत यांनी प्राचार्य यांना भविष्यात योग्य ते सावधानता बाळगण्या बाबतीत सुचना केल्या यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व वैद्यकीय अधिकारी डॉ.सई लिंगवत, उपप्राचार्य ऐ. जी. कांबळे, पालक रमेश नांदोसकर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य यांच्या सह  स्वयंपाक घराची पाहणी व विद्यालय परिसराची पाहणी करण्यात आली. प्राचार्य एम्. के. जगदीश यांनी या संदर्भात होत असलेल्या चौकशीला आपण संपूर्ण पुणे सहकार्य करत असुन भविष्यात अश्या घटना कदापि होणार नाहीत याची आपणं सतर्कता व सावधानता बाळगत असल्याचे सांगितले.


       🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments